Online Admission Form link for TYBA/TYBCom students start  from Tomorrow 18/05/2019 at 10.00 A.M. 
अस्मिता महाविद्यालय – मराठी भाषा दिन अहवाल

Event Details

01/09/2018

7:00 am - 6:00 pm

अस्मिता महाविद्यालय – मराठी भाषा दिन अहवाल


ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे

अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालय
बुधवारी दिनांक २७ फेब्रुवारी, २०१९ रोजी ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात मराठी साहित्य सम्राट वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला. कोयल तुरेवाले या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन करून उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थीनींचे स्वागत केले. त्यानंतर प्राध्यापिका दासगुप्ता यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर प्राध्यापिका नेहा दळवी यांनी या दिवसाचे महत्व सर्वांसमोर फारच सुरेखरीत्या मांडले.

 

पुढे सूत्रसंचालनाचा कार्यभार सांभाळणाऱ्या कोयलने कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्यांची नावे  घेऊन कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. तर मराठी भाषा व तिचा रोजच्या जीवनातील वापराबाबत मार्गदर्शनपर माहिती देऊन प्राध्यापिका सीमा फडके यांनी विद्यार्थीनींना प्रोत्साहन दिले. प्रियांका कुचेकर व पंचशीला पवार यांनी कुसुमाग्रजांचा अल्पपरिचय करून दिला. तर स्नेहा मोरे व विद्या यादव यांनी सुंदर गीत सादर केले. मराठी भाषेचा गोडवा शब्द रूपाने आणि सुरांच्या व तालांच्या मदतीने वर्गातील पाच विद्यार्थीनींनी सादर केला. तसेच इतर विद्यार्थीनींनीहि वेगवेगळ्या कविता सादर केल्या. उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थीनींचे आभार व्यक्त  करून विद्यार्थीनी अक्षता लाड हिने कार्यक्रमाची सांगता केली. हा मराठी राजभाषा गौरव दिन प्रथम वर्ष कला शाखेतील मराठी शिकविणाऱ्या प्राध्यापिका अंजना ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला गेला.