Admissions open for F.Y. B Com (English Medium), F.Y.B A. (Marathi Medium) for Girls,  F. Y. B. Sc., S. Y. B. Sc., T. Y. B. Sc (IT), F. Y. B. Sc.,  S. Y. B. Sc., T. Y. B. Sc (Computer Science)  for Boys and Girls for the Academic The year 2019-20. Contact Immediately - 022-25782466
” मा. श्री. मधु चव्हाण – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ सभापती , जाहीर सत्कार व संवाद समारोह″
  • 14-08-2019

ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे

अस्मिता कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय

अस्मिता बी. एस. सी. आय. टी., कॉम्प. सायन्स, अस्मिता विधी महाविद्यालय

                         दि.१४/०८/२०१९

संवाद समारोह अहवाल

ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अस्मिता महाविद्यालयात दिनांक १४ ऑगस्ट, २०१९ रोजी मा. श्री मधु चव्हाण – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ सभापती यांचा जाहीर सत्कार व संवाद समारोह आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. श्री मधु चव्हाण यांच्या समवेत त्यांचे सहाय्यक, तसेच  संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर नार्वेकर, अस्मिता वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा प्रणील नायर, अस्मिता  विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. गोरगे व  ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे विश्वासू, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच उत्कर्ष बाल मंदिर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या एन सी सी क्याडेट ने संचालन करून प्रमुख अतिथींचे जोरदार स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात मा. श्री मधु चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर नार्वेकर, अस्मिता वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा प्रणील नायर व अस्मिता  विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. गोरगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. तसेच विठ्ठल उमप यांनी लिहिलेल्या ‘विद्देचा कुंभ’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मधुकर नार्वेकर यांनी फेटा, शाल, श्रीफळ व संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन मा. श्री मधु चव्हाण यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक प्रा. अरुणा वेलणकर यांनी माननीय अतिथी श्री मधु चव्हाण यांचा परिचय करून दिला.

यानंतर अतिथी मा. श्री मधु चव्हाण यांनी अस्मिता महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी व विद्यार्थांशी थेट संवाद साधला. आपल्या भारत देशाची प्रगतीकडे होणारी वाटचाल, भारताची भव्य संस्कृती व ग्रंथसंपदा, तसेच प्रवाहाबरोबर भारतात होणारे सामाजिक परिवर्तन व त्यासाठी आपल्या देशाला युवा पिढीकडून सृजन नागरिक प्राप्त होण्याची असलेली गरज या विषयावर त्यांनी आपले मनोगत मांडले. सृजन नागरिक होण्यासाठी अवांतर व सखोल वाचन करून त्यातून आदर्श विचार आत्मसात करावे. समाजात कोणीही परिपूर्ण नसते, तरीही आपण सर्वतोपरी परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात प्रामाणिक राहून व कठीण परिस्थिती वर मात करून पुढे वाटचाल करत रहा. आयुष्यात निव्वळ तिजोरीतील सोनं मिळवण्यासाठी प्रयत्न करू नका तर त्यापेक्षा आपल्या आयुष्याचं सोनं करा, हा जगण्याचा मूलमंत्र त्यांनी या संवादातून मांडला.

वरिष्ठ महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या डॉ. नेहा दळवी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

अस्मिता महाविद्यालय – मराठी भाषा दिन अहवाल
  • 7:00 am - 6:00 pm


ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे

अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालय
बुधवारी दिनांक २७ फेब्रुवारी, २०१९ रोजी ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात मराठी साहित्य सम्राट वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला. कोयल तुरेवाले या विद्यार्थीनीने सूत्रसंचालन करून उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थीनींचे स्वागत केले. त्यानंतर प्राध्यापिका दासगुप्ता यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर प्राध्यापिका नेहा दळवी यांनी या दिवसाचे महत्व सर्वांसमोर फारच सुरेखरीत्या मांडले.

 

पुढे सूत्रसंचालनाचा कार्यभार सांभाळणाऱ्या कोयलने कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्यांची नावे  घेऊन कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. तर मराठी भाषा व तिचा रोजच्या जीवनातील वापराबाबत मार्गदर्शनपर माहिती देऊन प्राध्यापिका सीमा फडके यांनी विद्यार्थीनींना प्रोत्साहन दिले. प्रियांका कुचेकर व पंचशीला पवार यांनी कुसुमाग्रजांचा अल्पपरिचय करून दिला. तर स्नेहा मोरे व विद्या यादव यांनी सुंदर गीत सादर केले. मराठी भाषेचा गोडवा शब्द रूपाने आणि सुरांच्या व तालांच्या मदतीने वर्गातील पाच विद्यार्थीनींनी सादर केला. तसेच इतर विद्यार्थीनींनीहि वेगवेगळ्या कविता सादर केल्या. उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थीनींचे आभार व्यक्त  करून विद्यार्थीनी अक्षता लाड हिने कार्यक्रमाची सांगता केली. हा मराठी राजभाषा गौरव दिन प्रथम वर्ष कला शाखेतील मराठी शिकविणाऱ्या प्राध्यापिका अंजना ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला गेला.

 

Marathi Bhasha Din report 2018
  • 7:00 am - 6:00 pm

Marathi Bhasha Din report 2018

मराठी भाषा दिन

अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालात मंगळवारी दिनांक २७/०२/२०१८ रोजी मराठी साहित्याचे सम्राट वि. वा. शिरवाडकर म्हणजेच “कुसुमाग्रज” यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यानिमित्त संकल्प असोसिअशन तर्फे ‘मराठी भाषीय विद्यार्थिनींनसाठी नोकरीच्या नवीन संधी’ या विषयावर S. Y. B. A. व T. Y. B. A. च्या विद्यार्थिनींसाठी परिसंवाद  आयोजित करण्यात आला. या परिसंवादामार्फत  मराठी भाषिक विद्यार्थिनींना व्यवसाय व नोकरी साठी उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम अतिशय माहितीपूर्ण व परस्परसंवादी होता.

  1. Y. B. A. च्या विद्यार्थिनींसाठीसाठी ‘कुसुमाग्रज यांचा जीवनपट व साहित्य’ या विषयावर कार्यक्रम आयोजित केला. F. Y. B. A. ची विद्यार्थिनी मनाली आपटे हिने प्राचार्य डॉ. एच एस गोर्गे , उपप्राचार्य प्रोफ. मनीषा नायर व उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थांचे स्वागत करून कार्याक्रमची सुरेख सुरुवात केली. त्यानंतर प्राचार्यांनी दीपप्रज्वलन करून मराठी भाषा दिनाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. उपप्राचार्यांनी मराठी भाषा व भाषेचा रोजच्या जीवनातील वापराबाबत मार्गदर्शनपर भाषण केले.

विद्यार्थिनी काजल पेडणेकर, श्रद्धा गमरे, ऐश्वर्या जाधाव यांनी कुसुमाग्रजांबद्दल माहिती सांगितली. तर नेत्रा महाकाळ हिने त्यांच्या प्रसिद्ध नाटकांचा थोडक्यात परिचय दिला. अश्विनी नलावडे, दिपाली पाटील, सुजाता सकुडे, सुवर्णा पगारे, कांचनी  जाधव, भाग्यश्री इंगळे, शिवानी थवी, प्रिया केदारे, अश्विनी पोवार, ऋतुजा राक्षे, लक्ष्मि जाधव, विजिता शेडेकर यांनी कुसुमाग्रजांच्या व इतर प्रसिद्ध कवी व कावियात्रींच्या कवितांचे सुरेख सादरीकरण केले.

सदर मराठी राजभाषा गौरव दिन F. Y. B. A. ला मराठी शिकविणIर्या प्राध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला गेला. या कार्यक्रमाची सांगता तेजल मोरे या विद्यार्थिनीने केली व उपस्थित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थिनींनच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

तसेच अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील ग्रंथालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी साहित्यावर ग्रंथ व भित्तीपत्रके मांडण्यात आली.

अशा विविध कार्यक्रमांतून मराठी भाषेचा जागर व मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा संदेश विद्यार्थिनींनना देण्यात आला.

 

  • 1
  • 2