Intercollegiate Kabaddi Tournament at Asmita College on 30th Jan, 2019.
अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालय
आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी सामने
अहवाल
ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातर्फे दिनांक ३० जानेवारी, २०१९ रोजी आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी सामने आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रस्तरावरील कबड्डी खेळाडू मा. हिमाली विश्वजीत ढोलम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे संचालक मा. श्री. मधुकर नार्वेकर, अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा नायर व संस्थेचे विश्वस्त मा. श्री प्रणील नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आंतरमहाविद्यालयीन कबड्डी सामन्यांचा आरंभ करण्यात आला. या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील महिला कबड्डी संघ उपस्थित होते. प्रशिक्षक व सहभागी संघाच्या खेळाडूंनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. प्रेक्षक वर्गातील विद्यार्थिनींनी खेळणाऱ्या कबड्डी संघाना उस्फुर्त प्रतिसाद देऊन त्यांचे मनोबल वाढवले. उपांत्य फेरीत गुरु नानक खालसा महाविद्यालय, माटुंगा व वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड या संघात चुरशीचा सामना झाला. अंतिम फेरीत गुरु नानक खालसा महाविद्यालयाचा संघ विजयाचा मानकरी ठरला. कार्यक्रमाची सांगता पारितोषके, पदके व प्रमाणपत्रे देऊन करण्यात आली.